भजनी मालिका
← भजनांकडे परत

निर्दोषरहित सर्व गुणीं हेत

nirdosharahit sarva gunin het

निर्दोषरहित सर्व गुणीं हेत । द्वैत विवर्जित अरूप सदां ॥१॥ तें रूप स्वरूप कृष्ण बाळलीला । माजि त्या गोपाळा सदा वसे ॥२॥ गुणागुणी धीट वासना अविट । तद्रूप प्रगट निरंजन ॥३॥ विकार विवर्जित विवरण सोपे । अकार पैं लोपे एका नामें ॥४॥ निःसंदेह छंद वासनेचा कंद । ब्रह्माकार भेद नाहीं सदा ॥५॥ निवृत्ति परिवार ब्रह्मरूप गोकुळीं । वृंदावन पाळी यमुनातटीं ॥६॥