भजनी मालिका
← भजनांकडे परत

निर्वाणींची हे सांगितली खूण । कैबल्य चरण विठो-बाचे

nirvaninchi he sangitali khun | kaibalya charan vitho-bache

रचनाकार: संत नामदेव · अभंग
निर्वाणींची हे सांगितली खूण । कैबल्य चरण विठो-बाचे ॥१॥ वेद शास्त्र स्मृति वदती पुराणें । पाहूनि जाणणें हेंचि सत्य ॥२॥ क्रिया कर्म धर्म ज्यालगिं करणें । ते खूण निर्वाण हेंचि असे ॥३॥ जप तप अनुष्ठान कां करिजे साधन । तेंचि प्रत्यक्ष निधान हेंचि असे ॥४॥ नामा ह्मणे मज कळलें अनुभवें । न सोडीं हे जीवें चरण तुझे ॥५॥