भजनी मालिका

भजने

देव म्हणे नाम्या विसोबा खेचरासी । शरण तयासी जावें वेगीं ॥१॥ इतुकें ऐकोनि नमियेलें देवा । चालयेलाअ तेव्हां विसोबापाशीं ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

देव म्हणे नाम्या व्यापार बरवा केला । दामशेटी तुला रागावती ॥१॥ जाहले आठ दिवस जाईं तूं लौकरी । द्रव्य घेउनी झडकरी यावें मागें ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

देव म्हणे भक्तहो कांही तरी घ्यारे । ते म्हणती उरे शीणचि घेतां ॥१॥ याल तरि नेईन वैकुंठलोकां । ते म्हणती नका बंदीखान तें ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

देव म्हणे राहणें न घडेचि येथें । जावे आतां पुढतें उद्योगासी ॥१॥ निवृत्तिराज म्हणे शुद्ध प्रतिपदा । जाऊं जी गोविंदा प्रतिष्ठाना ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

देव म्हणे सांवत्या लपवी मजला । उशीर बहु जाहला येईल चोर ॥१॥ लपावया स्थान नसे दुजें आन । उदर फ़ाडून लपविला ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

देव राखे तया मारील कोण । न मोडे कांटा हिंडतां वन ॥१॥ न जळे न बुडे नव्हे कांहीं । विष तें ही अमृत पाहीं ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

देव रुक्माबाई आणिक साधुजन । करिती समाधान निवृतीचें ॥१॥ ज्ञानियांनी ऐसी करावी जंव खंती । अज्ञानाचा किती पाड आला ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

देव वसे पंढरीसी । येती सनकादिक ऋषी । वंदोनी पुडंलिकासी । चरण वंदिती विठ्ठलाचे ॥१॥ करीती कीर्तन गजर । नाना आद्यें परिकर । नाचती निर्धार । भाळे भोळे आवडीं ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

देव विठ्ठल तीर्थ विठ्ठल । अवघा विठ्ठल भरलासे ॥१॥ जन विठ्ठल वन विठ्ठल । जळीं स्थळीं विठ्ठल भरलासे ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

देव सखा आतां केलें नव्हे काई । येणें सकळई सोइरीं च ॥१॥ भाग्यवंत जालों गोतें सपुरतीं । आतां पुण्या नीती पार नाहीं ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम