भजनी मालिका
← भजनांकडे परत

देव वसे पंढरीसी । येती सनकादिक ऋषी । वंदोनी पुडंलिकासी । चरण वंदिती विठ्ठलाचे

dev vase pandharisi | yeti sanakadik rushi | vandoni pudanlikasi | charan vanditi viththalache

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
देव वसे पंढरीसी । येती सनकादिक ऋषी । वंदोनी पुडंलिकासी । चरण वंदिती विठ्ठलाचे ॥१॥ करीती कीर्तन गजर । नाना आद्यें परिकर । नाचती निर्धार । भाळे भोळे आवडीं ॥२॥ दिंडी जागरण एकादशीं । क्षीरपती द्वादशी करिताती आवडीसी । भक्त मिळोनी सकळ ॥३॥ मिळतां क्षीरापती शेष । तेणें सुख सुरवरास । एका जनार्दनीं दास । वैष्णवांचा निर्धारें ॥४॥