भजनी मालिका

भजने

देखणा जाहलों देखणां जाहलों । देखणा जाहलों विठ्ठला ॥१॥ जन्ममरण विसरलें । पाहतां पाहणें हारपलें ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

देखत होतों आधीं । मागें पुढें सकळ । मग हे दृष्टी गेली । वरी आले पडळ । तिमिर कोंदलेंसें । वाढे वाढतां प्रबळ । भीत मी झालों देवा । काय जाल्याचें फळ ॥१॥ आतां मज दृष्टी देई । पांडुरंगा मायबापा । शरण आलों आतां । निवारूनियां पापा । अंजन लेववुनी । करीं मारग सोपा । जाईन सिद्धिपंथें । अवघ्या चुकती खेपा ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

देखतांचि कांता दु:खी झाली फार । डोंगर तिजवर कोसळला ॥१॥ बोलतां तियेशी न निघती बोल । ऐसाची तो वेळ अवधारी ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

देखतांचि विठ्ठल मूर्ति । झाली विश्रांति इंद्रियां ॥१॥ डोळे मुख निवाले कान । देतां आलिंगन हदयें भुजा ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

देखती तीं दोन्ही पाडसें त्या काळीं । भिल्लापुढें आली लागवेगें ॥१॥ सांभाळोनि हात ऐकावी विनंती । धरीं कृपा चित्तीं आमुचिया ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

देखती निमाले आपुले पुर्वज । पितापुत्र सहज तेही गेले ॥१॥ नाहीं त्या यमासी करुणा कवणाची । भोगविती दुःखाची नाना योनी ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

देखिला अवचिता डोळा सुखाचा सागरु । मन बुद्धी हारपला झाले एककारु । न दिसे काया माय कृष्णी लागला मोहरु ॥१॥ अद्वया आनंदा रे अद्वया आनंदा रे । वेधियल्या कामिनी अद्वया आनंदा रे ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

देखिला देखिला योगियांचा रावो । रुक्मादेवीनाहो पंढरीचा ॥१॥ पुंडलिकासाठीं युगें अठ्ठावीस । धरोनी बाळवेष भीमातटीं ॥२॥

रचनाकार: संत चोखोबा

देखिला सांवळा राजा द्वारकेचा । सर्वही सुखाचा ठेवा दिसे ॥१॥ माथां तो मुगुट कुंडलें श्रवणीं । प्रभा दिनमणी तुच्छ जेथें ॥२॥

रचनाकार: संत नामदेव