भजनी मालिका
← भजनांकडे परत

देखतांचि कांता दु:खी झाली फार । डोंगर तिजवर कोसळला

dekhatanchi kanta du:khi jhali phar | dongar tijavar kosalala

रचनाकार: संत नामदेव · अभंग
देखतांचि कांता दु:खी झाली फार । डोंगर तिजवर कोसळला ॥१॥ बोलतां तियेशी न निघती बोल । ऐसाची तो वेळ अवधारी ॥२॥ नको आतां पडूं मायेचिये भरी । जाये वो सुंदरी स्वस्थळासी ॥३॥ माझी गति मज तुझी गति तुज । काय काज व्यर्थ प्राण द्यावा ॥४॥ घरीं तुझीं बाळें गोजिरें गोमटीं । जाऊनियां पोटीं धरीं त्यांसीं ॥५॥ न लावी उशीर जाई वो माघारी । जंव तो दुराचारी न देखतां ॥६॥ बाळा पाळण हाचि स्त्रियांचा धर्म । सां-गतसे वर्म जाई आतां ॥।७॥ माझिया प्रारब्धीं होतें तैसें झालें । तूं कां येथें बळें प्राण देसी ॥८॥ नामा ह्मणे ऐसें सांगे तिच्या हिता । प्री ते नाइकतां कष्टी होय ॥९॥