भजनी मालिका
← भजनांकडे परत

देखती निमाले आपुले पुर्वज । पितापुत्र सहज तेही गेले

dekhati nimale apule purvaj | pitaputra sahaj tehi gele

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
देखती निमाले आपुले पुर्वज । पितापुत्र सहज तेही गेले ॥१॥ नाहीं त्या यमासी करुणा कवणाची । भोगविती दुःखाची नाना योनी ॥२॥ सुकृत पदरीं मूळ नाहीं दोरा । घालितां अघोरा अंत न लगे ॥३॥ एका जनार्दनीं नाहीं तेथें सुख । भोगविती दुःख न सांगवे ॥४॥