भजनी मालिका
← भजनांकडे परत

देखणा जाहलों देखणां जाहलों । देखणा जाहलों विठ्ठला

dekhana jahalon dekhanan jahalon | dekhana jahalon viththala

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
देखणा जाहलों देखणां जाहलों । देखणा जाहलों विठ्ठला ॥१॥ जन्ममरण विसरलें । पाहतां पाहणें हारपलें ॥२॥ तुटली आशापाश बेडी । हेचि जोडी जोडली ॥३॥ एका जनार्दनीं देव । धरिला ठाव न सोडीं ॥४॥