भजनी मालिका

भजने

जिहीं अवलोकिला डोळां । हरील्या त्यांच्या जीवनकळा ॥१॥ ऐसा अनादि हा बुडवणा । आहे ठावा विचक्षणा ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

जिहीं धरुनी हरि मनीं । ह्रदयीं वदनीं रंजविला ॥१॥ त्यांचा झाला अंकित ऐसा । घरिंचा जैसा म्हणियारा ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

जिहीं निमिषमात्रें देह पालटिला । स्त्रियेचाचि केला पुरुष उभा ॥१॥ त्यांचे नवल कोण तारिती जड जीवा । यालागीं घडावा संतसंग ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

जिहीं भाव धरिला ठायीं । बुडी दिधली तुमच्या पायीं । त्यासी करुणेची करुनी साई । आपणापाशीं बैसविले ॥१॥ प्रल्हादा संकटीं रक्षिलें । ध्रुवासी अढळपदीं बैसविलें ॥ उपमन्या नेउनियां रक्षिलें । क्षीराब्धी वैभव देउनी ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

जीं जीं भक्त बोलतीं वचनें । तीं तीं प्रमाण करणें देवा ॥१॥ याजसाठीं अवतार । धरी मत्स्य कांसव सुकर ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

जीयेवेळीं चोरूनियां नेलीं वत्सें । तयालागीं तैसें होणें लागे ॥१॥ लागे दोहीं ठायी करावें पाळण । जगाचा जीवन मायबाप ॥२॥

रचनाकार: संत तुकाराम

जीव खादला देवत । माझा येणें महाभूतें । झोंबलें निरुतें । कांहीं करितां न सुटे ॥१॥ आतां करूं काय । न चले करितां उपाय । तुम्हां आम्हां सये । विघडाविघड केली ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

जीव जायवरी सांडी करी माता । हे तों आश्चर्यता बाळकाची ॥१॥ दुर्बळ कीं नाहीं आइकत कानीं । काय नारायणीं न्यून जालें ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

जीव जीती जीवना संगें । मत्स्या मरण त्या वियोगें॥१॥ जया चित्तीं जैसा भाव । तयां जविळ तैसा देव ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

जीव तोचि देव भोजन ते भक्ती । मरण तेचि मुक्ति पाखांड्याची ॥१॥ पिंडाच्या पोषके नागविलें जन । लटिकें पुराण केलें वेद ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

जीव विठ्ठल आत्मा विठ्ठल । परमात्मा विठठल विठ्ठल ॥१॥ जनक विठ्ठल जननी विठ्ठल । सोयरा विठ्ठल सांगाती ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

जीव शिव ग्रामी मीतूंपण पाही । हा गौरव कांहीं नाहीं नामीं ॥१॥ नाहीं चतुर्देह तूर्या हे उन्मनी । स्वयंभु ते खाणी निजनामाची ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

जीव शिव दोन्हीं एकचि आसनीं । पूजी अवसानीं सर्वकाळ ॥१॥ कामक्रोध यांचा मानूनि विटाळ । पूजन सर्वकाळ बरें होय ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ