भजनी मालिका
← भजनांकडे परत

जिहीं भाव धरिला ठायीं । बुडी दिधली तुमच्या पायीं । त्यासी करुणेची करुनी साई । आपणापाशीं बैसविले

jihin bhav dharila thayin | budi didhali tumachya payin | tyasi karunechi karuni sai | apanapashin baisavile

रचनाकार: संत निळोबा · अभंग
जिहीं भाव धरिला ठायीं । बुडी दिधली तुमच्या पायीं । त्यासी करुणेची करुनी साई । आपणापाशीं बैसविले ॥१॥ प्रल्हादा संकटीं रक्षिलें । ध्रुवासी अढळपदीं बैसविलें ॥ उपमन्या नेउनियां रक्षिलें । क्षीराब्धी वैभव देउनी ॥२॥ उध्दवासी ब्रम्हरस पाजिला । अर्जुना निजबोध अर्पिला । दौपदीचा लळा पाळिला । वस्त्राभरणें पुरविली ॥३॥ गौळणींचे प्रिय संवाद । नित्य भक्षणें त्यांचे दुग्ध । गोवळांसवें हुंबरी साद । हमामा हुतुतु खेळणें ॥४॥ जिहीं तुमचें धरिलें प्रेम । आवडीं वदनीं गाईलें नाम । त्यांचा करुनियां संभ्रम । निजानंदा पात्र केलें ॥५॥ नामदेवा ज्ञानदेवा । निवृतित्तनाथा चांगदेवा । एकोबा तुकोबाचिया भावा । तैसेंचि वर्ता श्रीहरी ॥६॥ निळा म्हणे मी तो दीन । सकळ संतांचा चरणरेण । तुमच्या स्तवनीं ठेविलें मन । येईल चित्ता तैसें करा ॥७॥