भजनी मालिका
← भजनांकडे परत

जिव्हेच्या निडळी नामाक्षराचि वोळी

jivhechya nidali namaksharachi voli

जिव्हेच्या निडळी नामाक्षराचि वोळी । कान्हो वनमाळी या वोजा ॥१॥ लेहोन घाली पान पुसती जैसी । भलतिये रसीं बुडी दे कां ॥२॥ माझे डोळा समजी सुनिळ सहजी । होय तूं बिजीं बाहुलिये ॥३॥ ऐसि वाचा दिठी नाम रुपें आथिली । वासने वरी वहिली उठो दे कां ॥४॥ तुझें उठिलेंपण आह्मां होवावें निकें ॥ तरी गोसावीया पाइकेंसि यावें किजी ॥५॥ बापरखुमादेविवरु विठ्ठलु आंतु बाहेरी सुखें । तरी तुजसी म्यां एके नांदावें किजी ॥६॥