भजनी मालिका
← भजनांकडे परत

जीव जीती जीवना संगें । मत्स्या मरण त्या वियोगें

jiv jiti jivana sangen | matsya maran tya viyogen

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
जीव जीती जीवना संगें । मत्स्या मरण त्या वियोगें॥१॥ जया चित्तीं जैसा भाव । तयां जविळ तैसा देव ॥ध्रु.॥ सकळां पाडीये भानु । परि त्या कमळाचें जीवनु ॥२॥ तुका म्हणे माता । वाहे तान्हे याची चिंता ॥३॥