भजनी मालिका

भजने

जनार्दनें केलें अभिनव देखा । तोडियेलें शांखा अद्वैताची ॥१॥ केला उपकार केला उपकार । मोडियेलें घर प्रपंचाचें ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

जनार्दनें मज सांगितला मंत्र । रामनम पवित्र जप करीं ॥१॥ सोडवील राम संसार सांकडीं । न पडेचि बेडी अरिवर्गां ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

जनार्दनें माझें केलें असे हित । दाविला देहातीत देव मज ॥१॥ नाठवे भाव अभावना तें कांहीं । स्वर्ग मोक्षनाहीं चाड आम्हां ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

जनिता जीवविता सर्वज्ञ प्रतिपाळिता । आडणी सांभाळितां चराचरीं ॥१॥ एक पांडुरंग दुजा नाहीं चांग । म्हणुनि याचा संगा धरिला माते ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

जनीं जनार्दन ऐकतों हे मात । कैसा तो वृत्तांत न कळे आम्हां ॥१॥ जन्म जरा मरण कवण भोगी भोग । व्याधि नाना रोग सुखदुःखें ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम