भजनी मालिका
← भजनांकडे परत

जनासी तारक विठ्ठलचि एक

janasi tarak viththalachi ek

जनासी तारक विठ्ठलचि एक । केलासे विवेक सनकादिकीं ॥ १ ॥ तें रूप वोळले पंढरीस देखा । द्वैताची पै शाखा तोडीयेली ॥ २ ॥ उगवलें बिंब अद्वैत स्वयंभ । नाम हें सुलभ विठ्ठलराज ॥ ३ ॥ निवृत्तीचें गूज विठ्ठल सहज । गयनीराजें मज सांगितलें ॥ ४ ॥