भजनी मालिका
← भजनांकडे परत

जनीं जनार्दन ऐकतों हे मात । कैसा तो वृत्तांत न कळे आम्हां

janin janardan aikaton he mat | kaisa to vruttant na kale amhan

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
जनीं जनार्दन ऐकतों हे मात । कैसा तो वृत्तांत न कळे आम्हां ॥१॥ जन्म जरा मरण कवण भोगी भोग । व्याधि नाना रोग सुखदुःखें ॥ध्रु.॥ पापपुण्यें शुद्धाशुद्ध आचरणें । हीं कोणांकारणें कवणें केलीं ॥२॥ आम्हां मरण नाश तूं तंव अविनाश । कैसा हा विश्वास साच मानूं ॥३॥ तुका म्हणे तूं चि निवडीं हा गुढार । दाखवीं साचार तें चि मज ॥४॥