भजनी मालिका

भजने

चंचळ तें मन मुष्टीमाजी धरी । नामपाठ हरि गाये सदा ॥१॥ जोडेल सर्व सिद्धि तुटेल उपाधी । नामपाठी आधींभावें गाय ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

चंचळत्व मनाचें मोडे । दृष्टीचें स्थिरत्व जोडे । सहज समाधि घडे । हरिकॄपेनें पाहे पां ॥१॥ पवफ़्न पवनाची आटणी । आसनीं दृढ दृष्टी ठेउनी । गोल्हाट भेदोनी । त्रिकुटाचल मस्तकीं ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

चंचळीं चंचळ निश्चळीं निश्चळ । वाजवी खळाळ उदकासी ॥१॥ सोपें वर्म परि मन नाहीं हातीं । हा हा भूत चित्तीं भ्रम गाढा ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

चढोनियां झाडा पोरा खेळसी सुरकांडी । निसरतां हात पाय माझा होईल मोडी ॥१॥ धरुनी हरि चित्तिसी खेळे वरिझाडा । अभिमानें जासी तरी होईल चुरा हाडा ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

चण्डभिल्ल तेणें ऐकिलें बोलणें । सावधान मनें करो-नियां ॥१॥ तेव्हां होती चित्तीं वासना जे खोटी । जिरऊनि पोटीं चाकाटला ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

चतुर मी जालों आपुल्या भोंवता । भावेंविण रिता स्फुंद अंगीं ॥१॥ आतां पुढें वांयां जावें हें तें काई । कामक्रोधें ठायीं वास केला ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

चतुरपणें चतुराननु पैं भागला । शिवुपणें शिवरुपु पैं जाहला ॥१॥ हरिपणें हरि अंग रिघाला । या तिहींचा मेळा न दिसे गे माये ॥ध्रु०॥

चतुर्भुज दिसे शंखचक्र हातीं । मुकूट शोभती सर्वां -लागीं ॥१॥ कर्णीचीं कुंडलें वैजयंती माळा । देखतसे डोळां ब्रह्म-देव ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

चतुर्भुज श्याममुर्ति । शंखचक्र ते शोभती । पीतांबर वैजयंती । रुळती गळां ॥१॥ देव देखिला देखिला । तेणें संसाराचा ठावो पुशिला । विदेही तो भेटला । भक्त तयातें ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

चंदनाचे गांवीं सर्पांच्या वसति । भोगिते ते होती द्वीपांतरीं ॥१॥ एका ओझें एका लाभ घडे देवा । संचिताचा ठेवा वेगळाला ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

चंदनाचे झाडा भुजंग वेष्टला । प्राणी तो गुंतला तैसा व्यर्थ ॥१॥ कमळणीं पुष्पीं भ्रमर गुंतला । प्राणी वोथंबला तयापरी ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

चंदनाचे संगे बोरीया बाभळी । हेकळी टाकळी चंदनाची ॥१॥ संतांचिया संगें अभाविक जन । तयाच्या दर्शनें तेची होती ॥२॥

रचनाकार: संत चोखोबा

चंदनाचे हात पाय ही चंदन । परिसा नाहीं हीन कोणी अंग ॥१॥ दीपा नाहीं पाठीं पोटीं अंधकार । सर्वांगें साकर अवघी गोड ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम