भजनी मालिका
← भजनांकडे परत

चतुर्भुज दिसे शंखचक्र हातीं । मुकूट शोभती सर्वां -लागीं

chaturbhuj dise shankhachakra hatin | mukut shobhati sarvan -lagin

रचनाकार: संत नामदेव · अभंग
चतुर्भुज दिसे शंखचक्र हातीं । मुकूट शोभती सर्वां -लागीं ॥१॥ कर्णीचीं कुंडलें वैजयंती माळा । देखतसे डोळां ब्रह्म-देव ॥२॥ कौस्तुभ ह्लदयीं श्रीवत्सलांछन । बाहूचीं भूषणें पाहातसे ॥३॥ चरणीं तोडर पीत पीतांबर । तेजें दिवाकर लोपतसे ॥४॥ आपादपर्यंत तुळसीच्या माळा । मुद्रिका दयांगुळा रत्नाचिया ॥५॥ केशराचे टिळे नेत्र कमलाकर । दंतीं इंदुकर बैसलेती ॥६॥ कोटी-कृष्ण मूर्ति कोटि ब्रह्में दिसती । स्तवनीं स्तविताती सुरवर ॥७॥ नामा ह्मणे ऐसें दावीत गोविंद । झालासे सावध ब्रह्मा तेव्हां ॥८॥