भजनी मालिका
← भजनांकडे परत

चतुरानन घन अनंत उपजती

chaturanan ghan anant upajati

चतुरानन घन अनंत उपजती । देवो देवी किती तयामाजि ॥ १ ॥ तेंचि हें सांवळें अंकुरलें ब्रह्म । गोपसंगे सम वर्ते रया ॥ २ ॥ निगमा नाठवे वेदाचां द्योतुकु । तो चतुर्भुज देखु नंदाघरीं ॥ ३ ॥ निवृत्ती म्हणे शंखचक्रांकितमूर्ति । आपण श्रीपति क्रीडतसे ॥ ४ ॥