भजनी मालिका
← भजनांकडे परत

चंदनाचे हात पाय ही चंदन । परिसा नाहीं हीन कोणी अंग

chandanache hat pay hi chandan | parisa nahin hin koni ang

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
चंदनाचे हात पाय ही चंदन । परिसा नाहीं हीन कोणी अंग ॥१॥ दीपा नाहीं पाठीं पोटीं अंधकार । सर्वांगें साकर अवघी गोड ॥ध्रु.॥ तुका म्हणे तैसा सज्जनापासून । पाहातां अवगुण मिळे चि ना ॥२॥