भजनी मालिका
← भजनांकडे परत

चंदनाचे झाडा भुजंग वेष्टला । प्राणी तो गुंतला तैसा व्यर्थ

chandanache jhada bhujang veshtala | prani to guntala taisa vyartha

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
चंदनाचे झाडा भुजंग वेष्टला । प्राणी तो गुंतला तैसा व्यर्थ ॥१॥ कमळणीं पुष्पीं भ्रमर गुंतला । प्राणी वोथंबला तयापरी ॥२॥ मंजुळ गायनी । कुरंग वेधला प्राणी तो गुंतला तैशापरी ॥३॥ मोहळ कंदासी मक्षिका गुंतली । तैशी परी जाहली प्राणियासी ॥४॥ एका जनार्दनीं गुंतू नको वायां । जासी भोगावया सुख दुःख ॥५॥