भजनी मालिका

भजने

गुंतलासी मायापाशी । कोण सोडवील तुजसी । धाये मोकलेनि रडसी । न ये करूणा कवणातें ॥१॥ वाचे सदा नाम गाय । तेणें चुकती अपाय । सहजची सोय । नाम मुखीं वदतां ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

गुतंली भ्रमर कमळणी कोशीं । आदरें आमोदासी सेवितसे ॥१॥ तैसें रामनामीं लागतां ध्यान । मन उन्मन होय जाण रामनामीं ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

गुंतलों प्रपंचीं सोडवी गा देवा । देई तुझी सेवा जीवेंभावें ॥१॥ न लगे धन मान पुत्र दारा वित्त । सदां पायीं चित्त जडोनि राहो ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

गुरु जनार्दन सांगे राममंत्र । पूजावे पवित्र द्विजवर ॥१॥ जोडिली संपदा ब्राह्मणासी द्यावी । अखंड करावी चरणसेवा ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

गुरुकृपे मज बोलविलें देवें । होइऩल हें घ्यावें हित कांहीं ॥१॥ सत्य देवें माझा केला अंगीकार । आणीक विचार नाहीं आतां ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

गुरुमार्गामुळें भ्रष्ट सर्वकाळ । म्हणती याती कुळ नाहीं ब्रह्मीं ॥१॥ पवित्राला म्हणती नको हा कंटक । मानिती आत्मिक अनामिका ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

गुरुमुखें घेतां तो निर्दोष । येर्‍हर्वीं आयास पडे कष्ट ॥१॥ राम कृष्न हरिमंत्र हा सोपा । उच्चारितां खेपा खंडे कर्म ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

गुरुराव गुण गंभीरवो वावो चैतन्य प्रकाशु । योगी सहज सुकामिनी विलासु ॥ध्रु०॥ चिदानंदधनु तनु सांवळावो हरि पाहातां निवती लोचन । तनु मन चरणीं वो गुंतलीं नाम गोपा-ळाचें अमृत समान ॥१॥

रचनाकार: संत नामदेव