भजनी मालिका
← भजनांकडे परत

गुरुमार्गामुळें भ्रष्ट सर्वकाळ । म्हणती याती कुळ नाहीं ब्रह्मीं

gurumargamulen bhrashta sarvakal | mhanati yati kul nahin brahmin

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
गुरुमार्गामुळें भ्रष्ट सर्वकाळ । म्हणती याती कुळ नाहीं ब्रह्मीं ॥१॥ पवित्राला म्हणती नको हा कंटक । मानिती आत्मिक अनामिका ॥ध्रु.॥ डोहोर होलार दासी बलुती बारा । उपदेशिती फारा रांडापोरा ॥२॥ कांहीं टाण्या टोण्या विप्र शिष्य होती । उघडी फजिती स्वधर्माची ॥३॥ नसता करुनी होम खाती एके ठायीं । म्हणती पाप नाहीं मोक्ष येणें ॥४॥ इंद्रियांचे पेठे भला कौल देती । मर्यादा जकाती माफ केली ॥५॥ नाहीं शास्त्राधार पात्रापात्र नेणे । उपदेशून घेणें द्रव्य कांहीं ॥६॥ तुका म्हणे ऐसे गुरु शिष्य जाण । विठोबाची आण नरका जाती ॥७॥