भजनी मालिका
← भजनांकडे परत

गुरुकृपे मज बोलविलें देवें । होइऩल हें घ्यावें हित कांहीं

gurukrupe maj bolavilen deven | hoinal hen ghyaven hit kanhin

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
गुरुकृपे मज बोलविलें देवें । होइऩल हें घ्यावें हित कांहीं ॥१॥ सत्य देवें माझा केला अंगीकार । आणीक विचार नाहीं आतां ॥ध्रु.॥ होइऩ बळकट घालूनियां कास । हाचि उपदेश तुज आतां ॥२॥ सडा संमार्जन तुळसीवृंदावन । अतीतपूजन ब्राम्हणाचें॥३॥ वैष्णवांची दासी होइप सर्वभावें । मुखीं नाम घ्यावें विठोबाचें ॥४॥ पूर्णबोध स्त्रीभ्रतारसंवाद । धन्य जिहीं वाद आइकिला॥५॥ तुका म्हणे आहे पांडुरंगकथा । तरेल जो चित्ता धरील कोणी ॥६॥