भजनी मालिका
← भजनांकडे परत

गुरुकृपा झाली प्रत्ययासी आली

gurukrupa jhali pratyayasi ali

गुरुकृपा झाली प्रत्ययासी आली | कैशी ती कळली सांगा दादा ॥१॥ लेखा नाही आला साधन करितां । तो कैसा येईल हाता सांगा दादा ॥२॥ व्यास तो वाल्मिक वर्णिती अपार । तयांसी हा पार कळला नाहीं ॥३॥ वेदासी ना कळे, श्रुति | बेडावले तो कैसेनि येईल | हाता सांग दादा ॥४॥ इंद्रियां वेगला, मन बुद्धि निराळा । सर्वांत व्यापिला कळे कैसा ॥५॥ मुक्ताबाई म्हणे कैसे ज्ञानराजा | संदेह हा माजा फेडोनिया ॥६॥ ॥