भजनी मालिका
← भजनांकडे परत

गुरुनिकट वासगुरु मुखें श्रवण

gurunikat vasaguru mukhen shravan

रचनाकार: संत जनार्दन · अभंग
गुरुनिकट वासगुरु मुखें श्रवण । मनन आचरण सर्व स्वेसी ॥१॥ झाल्यावीण आधीं साधनी प्रवीण । शिष्या आत्म खुण देवो नये ॥२॥ ऐसे झाल्यावेन दिधल्या नोहे । प्राप्त नोहेचि उद्धार बुडे अधिक ॥३॥ तेवी देवो नये शिष्य झाल्या वीण । दिधल्यावीण मंत्र संप्रदाय ॥४॥ करोनि पुजन आधी झाल्यावीण । सबार्ह्म अर्पण सर्वस्वेशीं ॥५॥ गुरुशिष्यीं हो मर्यादा सांडिली । यालागी बुडाली योगास्थिती ॥६॥ लक्षो निया देही भजावा श्रीराम । तारक तें नाम ते चि भक्ति ॥७॥ जपती तेंचि नाम संत हरि हर । बाह्म दंभ येर अमक्ति ते ॥८॥ येथें सर्व पात्र नारी नर शुद्र । असे अधिकार सकळांसी ॥९॥ आळसें अभिमानें खोवुं नये स्वहित । वदोनि भगवंत बुद्धी दाता ॥१०॥ व्हावया उद्धार पाहती पितरे वास । आतांची श्रीगुरुस शरण व्हावें ॥११॥ नोहे जो प्रत्यक्ष स्वानुभर्वे मुक्त । भुमीवरी व्यर्थ जन्मा आला ॥१२॥ म्हणे जनार्दन स्वानुभव घाटी । उघडी भ्रमताटी एकनाथा ॥१३॥