भजनी मालिका
← भजनांकडे परत

गुंतलों प्रपंचीं सोडवी गा देवा । देई तुझी सेवा जीवेंभावें

guntalon prapanchin sodavi ga deva | dei tujhi seva jivembhaven

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
गुंतलों प्रपंचीं सोडवी गा देवा । देई तुझी सेवा जीवेंभावें ॥१॥ न लगे धन मान पुत्र दारा वित्त । सदां पायीं चित्त जडोनि राहो ॥२॥ वैष्णवांचा दास कामारी निःशेष । हेचि पुरवी आस दुजें नको ॥३॥ एका जनार्दनीं करीत विनंती । मागणें श्रीपति हेंचि द्यावें ॥४॥