भजनी मालिका

भजने

कीर्तन केलें ब्रम्हानंदे । ध्रुव प्रल्हादें एकनिष्ठ ॥१॥ तयां केलें सुखसंपन्न । त्रैलाक्यीं मान वाढवुनी ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

कीर्तन ते पूजा कीर्तन तें भक्ति । कीर्तनें होय मुक्ति सर्व जीवां ॥१॥ पातकी चांडाळ असोत भलते । कीर्तनीं सरते कलियुगी ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

कीर्तन श्रेष्ठ कलियुगीं सेवा । तरले पातकी ते देवा ॥१॥ वाल्हा तारिला कीर्तनीं । पावन जाला त्रिभुवनीं ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

कीर्तनाचा गजर होत आनंदाने । तंव नामा म्हणे उच्चारा नाम ॥१॥ टाळी बाहुनी होतें मुखीं वदा नाम । ऐकतां सकाम भक्त जाहले ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

कीर्तनाचा रस आवडे नरासी । लागती पायांसी मुक्ति चार्‍ही ॥१॥ वारी पंढरीचा निश्चयें म्यां केला । वारकरी झाला पंढरीचा ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

कीर्तनाचा रस आवडे नरासी लागती पायांसी मुक्ति चान्ही ।।१।। वारी पंढरीची निश्चय म्यां केला । वारकरी झाला पंढरीचा ।। २।।

रचनाकार: संत जनाबाई

कीर्तनाच्या सुखें सुखी होय देव । पंढरीचा राव संगीं आहे ॥१॥ भक्त जाय सदा हरी कीर्ति गात । त्यासेवें अनंत हिंडतसे ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

कीर्तनाच्या सुर्खे होतो देव । कोण तें वैभव वाणी आतां ॥१॥ अंत्यज आणि जातिवंता । मुखीं नाम घेतां उडी घाली ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

कीर्तनासी जातां मागी टाकी पाय अमर देह होय कळे त्यासी ॥१॥ ओखद तरी तेथे घड़े हिंसा जन्मवेद भाषा वेदापाशीं ॥ २॥

रचनाकार: संत जनाबाई