भजनी मालिका
← भजनांकडे परत

कीर्तनाची देवा आवडी । म्हणोनी धांवे तो तांतडी

kirtanachi deva avadi | mhanoni dhanve to tantadi

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
कीर्तनाची देवा आवडी । म्हणोनी धांवे तो तांतडी ॥१॥ सुख कीर्तनींअद्भुत आहे । शंकरराज जाणताहे ॥२॥ गोडी सेविती संतजन । येरां न कळे महिमान ॥३॥ ऐसा कीर्तनसोहळा । एका जनार्दनीं पहा डोळां ॥४॥