भजनी मालिका
← भजनांकडे परत

कीर्तनाचें थोर सुख । यदुनायक राहे उभा

kirtanachen thor sukh | yadunayak rahe ubha

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
कीर्तनाचें थोर सुख । यदुनायक राहे उभा ॥१॥ भाळे भोळे घेती नाम । करिती आराम कीर्तन ॥२॥ नाना साधनांचे वोढी । न लगे सांकडी सोसाव्या ॥३॥ एका जनार्दनीं सोपें बहू । कीर्तनीं पाहे देवातें ॥४॥