भजनी मालिका
← भजनांकडे परत

कीर्तनरगें जे जे । ते ते सहजें हरिप्रीय

kirtanaragen je je | te te sahajen haripriy

रचनाकार: संत निळोबा · अभंग
कीर्तनरगें जे जे । ते ते सहजें हरिप्रीय ॥१॥ येर मुमुक्ष्रू जे जे होती । कीर्तनें पावती ते लाभा ॥२॥ महा अनुष्ठान हरिची कथा । नित्य जोडतां सुखप्राप्ती ॥३॥ निळा म्हणे कैवल्यपद । पावती अभेद हरिकीर्ति ॥४॥