भजनी मालिका
← भजनांकडे परत

कीर्तनासाठी चारी मुक्ती । उभ्या राबती हरिदासां

kirtanasathi chari mukti | ubhya rabati haridasan

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
कीर्तनासाठी चारी मुक्ती । उभ्या राबती हरिदासां ॥१॥ कलीयुगीं हेंचि सार । करावें साचार कीर्तन ॥२॥ कृता त्रेता द्वापारीं । कीर्तनमहिमा परोपरी ॥३॥ एका तयांसी शरण । कीर्तन करितीं अनुदिन ॥४॥