भजनी मालिका

भजने

ऐसें केशियाचें हनन । केलें देखोनियां सकळ जन गोकुळीचें विस्मयपत्र म्हणती न कळे महिमान श्रीहरिचें ॥१॥ कृत्रिम वेषिया तुरंगम । आला इच्छूनियां सग्राम । कैसा जाणूनियां मेघ:शाम । तयावरी सरसावला ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

ऐसे कैसे जाले भोंदू । कर्म करोनि म्हणति साधु ॥१॥ अंगा लावूनियां राख । डोळे झांकुनी करिती पाप ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

ऐसें जाणोनियां श्रीहरि । पालखी निजविल्या रुदन करी । न राहे अंकीही क्षणभरी । निवितां शेजारी तैसाची ॥१॥ काय करुं गे यशोदा म्हणे । कां हे करितीहे रुदनें । दिठावलें माझें तान्हें । निंबलोण उतरी तया ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

ऐसें जे धाले पुर्ण निमाले । ते नाहीं आले परतोनियां ॥१॥ घडीनें घडी चढतसे गोडी । अखंड आवडी संतापायीं ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

ऐसें झालें पूर्ण ध्रुवाचें आख्यान । ऐकती जर जन एका भावें ॥१॥ तयावरी कृपा देवाची होईल । केलें तें लाभेल सर्व काज ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

ऐसें तीर्थ कोणी दाखवा गोमटें । जेथें प्रत्यक्ष हें भेटे परब्रह्म ॥१॥ कोठें ऐसें क्षेत्र आहे त्रिभुवनीं । सकळां शिरोमणि चंद्रभागा ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

ऐसें तीर्थ कोणी दाखवा सुलभ । जेथें समारंभ हरि-कथेचा ॥१॥ तें एक पंढरी विख्यात त्रिभुवनीं । सकळां शिरोमणी चंद्रभागा ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

ऐसे देव आणि ऋषेश्वर । हर्ष होऊनियां निर्भर । नंदयशोदेचें वारंवार वर्णिती भाग्य निजमुर्खे ॥१॥ न संपडे जो योगसाधने । नाना तपें वेदाध्ययने । तो हा सगुणरुपें नारायण । क्रिडा करी याच्या घरीं ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

ऐसे नाना भेष घेऊनी हिंडती । पोटासाठी घेती प्रतिग्रह ॥१॥ परमार्थासी कोण त्यजी संवसार । सांगापां साचार नांव त्याचें ॥२॥

रचनाकार: संत तुकाराम

ऐसें नानापरी सांगती गार्‍हाणे । ऐकता घडे कोटी अश्वमेध यज्ञ ॥१॥ पुनरपी संसार नवेची मागुती । शंख चक्र गदा पद्म ऐसे जन्म होती ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

ऐसे नित्यकाळ जाताती वना । गोपाळ रामकृष्ण खेळती खेळ नाना ॥१॥ यमुनेचे तटीं कळंबा तळवटीं । मांडियला काला गोपाळांची दाटी ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

ऐसें नित्यानंदभरित क्रमिताती मार्गु । ह्रदयीं तो अनुरागु आवडीचा ॥१॥ प्रेमें वोसंडत करितो स्वहितगोष्टी । द्राविती कसोटी अनुभवाची ॥२॥

रचनाकार: संत नामदेव