भजनी मालिका
← भजनांकडे परत

ऐसें जाणोनियां श्रीहरि । पालखी निजविल्या रुदन करी । न राहे अंकीही क्षणभरी । निवितां शेजारी तैसाची

aisen janoniyan shrihari | palakhi nijavilya rudan kari | na rahe ankihi kshanabhari | nivitan shejari taisachi

रचनाकार: संत निळोबा · अभंग
ऐसें जाणोनियां श्रीहरि । पालखी निजविल्या रुदन करी । न राहे अंकीही क्षणभरी । निवितां शेजारी तैसाची ॥१॥ काय करुं गे यशोदा म्हणे । कां हे करितीहे रुदनें । दिठावलें माझें तान्हें । निंबलोण उतरी तया ॥२॥ तरी न राहे रुदतां । अधिक् अधिक् आक्रंदतां । यशोदा म्हणे बाहेरी आतां । नेऊं तरी कोणाकडे ॥३॥ मग घेऊनियां कडियेवरी । काग दाविला निंबाबरी । तया देखोनियां हास्य करी । मग ते सुंदरी हरिखली ॥४॥ म्हणे निजऊनियां येथें । करीन कामकाज ऐसें । विचारुनियां चित्तें । म्हणे कागातें अवलोकीं ॥५॥ ऐशापरी निजविला । क्षण एक काजकामीं गेला । तंव काग तेथूनियां उठविला । झडपूं आला गोविंदा ॥६॥ देखोनी यशोदा घाबरी । हाहाकार केला इतरीं । निळा म्हणे तो असूरी हरीचीवरी झेपावला ॥७॥