भजनी मालिका
← भजनांकडे परत

ऐसे नित्यकाळ जाताती वना । गोपाळ रामकृष्ण खेळती खेळ नाना

aise nityakal jatati vana | gopal ramakrushna khelati khel nana

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
ऐसे नित्यकाळ जाताती वना । गोपाळ रामकृष्ण खेळती खेळ नाना ॥१॥ यमुनेचे तटीं कळंबा तळवटीं । मांडियला काला गोपाळांची दाटी ॥२॥ आणिती शिदोर्‍या आपाअपल्या । जया जैसा हेत तैशा त्या चांगल्या ॥३॥ शिळ्या विटक्या भाकरी दहीं भात लोणी । मिळेवोनी मेळा करी चक्रपाणी ॥४॥ एका जनार्दनीं अवघ्यां देतो कवळ । ठकविलें तेणें ब्रह्मादिक सकळ ॥५॥