भजनी मालिका

भजने

उभारिला ध्वज तिहीं लोकांवरी । ऐशी चराचरी कीर्ति ज्याची ॥१॥ ते हे निवृत्तिनाथ ज्ञानेश्वर सोपान । मुक्ताबाई ज्ञान दीप्ती कळा ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

उभारुनी बाह्मा सकळां आश्वासन । या रे अठरा वर्ण पंढरीसी ॥१॥ दरुशनें एकामुक्ति जोडे फुका । साधनांचा धोका करुं नका ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

उभारुनी ब्राह्मा पाहतसे वाट । पीतांबर नीट सांवरुनी ॥१॥ आलियासी इच्छा मिळतसे दान । जया जें कारण पाहिजे तें ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

उभे चंद्रभागे तीरीं । कट धरोनिया करीं । पाउले गोजिरीं । विटेविरी शोभलीं ॥१॥ त्याचा छंद माझ्या जीवा । काया वाचे मनें हेवा । संचिताचा ठेवा । जोडी हातीं लागली ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

उभें वृंदावन जयाचिये द्वारीं । होय तो श्रीहरि प्रसन्न त्या ॥१॥ तुळसीचें रोप लावील जो आणोनि । तया चक्र-पाणी न विसंबे ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

उमटलीं विष्णूपदें । गयावर्जनीं जे प्रसिध्दें ॥१॥ नारद क्षेत्रीं पंढरपुरीं । अदभुत पदांची त्या थोरी ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

उरलें तें भक्तिसुख । डोळां मुख पाहावें । अंतरींचें कां हों नेणां । नारायणा माझिये ॥१॥ पुरवां तैसी केली आळी । बळी जगदानियां ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

उरा लावी उर आळंगितां कांता । संतासी भेटतां अंग चोरी ॥१॥ अतीत देखोनि होय पाठीमोरा । व्याह्यासी सामोरा जाय वेगीं ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

उलट पालट कासया खटपटी । नको तूं कपाटी रिघूं वायां ॥१॥ आसन मातृका साधन समाधी । वाउगी उपाधि तेणें होय ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

उलट भावना पालट मनाची । कायावाचा देहाची स्थिती एक ॥१॥ होणार तें होय देहाचें पतन । तेथें कोणा कमीपण येतें जातें ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ