भजनी मालिका
← भजनांकडे परत

उभारिला हात । जगीं जाणविली मात

ubharila hat | jagin janavili mat

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
उभारिला हात । जगीं जाणविली मात ॥१॥ देव बैसले सिंहासनीं । आल्या याचकासी होय धनी ॥ध्रु.॥ एकाच्या कैवाडें । उगवे बहुतांचें कोडें ॥२॥ दोहीं ठायीं तुका । नाहीं पडों देत चुका ॥३॥