भजनी मालिका
← भजनांकडे परत

उभ्या बाजारांत कथा । हे तों नावडे पंढरिनाथा

ubhya bajarant katha | he ton navade pandharinatha

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
उभ्या बाजारांत कथा । हे तों नावडे पंढरिनाथा॥१॥ अवघें पोटासाटीं सोंग । तेथें कैंचा पांडुरंग ॥ध्रु.॥ लावी अनुसंधान। कांहीं देईल म्हणऊन ॥२॥ काय केलें रांडलेंका । तुला राजी नाहीं तुका ॥३॥