भजनी मालिका
← भजनांकडे परत

उल्लंघिली लाज । तेणे साधियेले काज

ullanghili laj | tene sadhiyele kaj

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
उल्लंघिली लाज । तेणे साधियेले काज ॥१॥ सुखे नाचो पैलतीरीं । गेलों भवाचे सागरीं ॥ध्रु ॥ नामाची सांगडी । सुखे बांधिली आवडी ॥२॥ तुका म्हणे लोकां । उरली वाचा मारीं हाका॥३॥