भजनी मालिका
← भजनांकडे परत

उभें वृंदावन जयाचिये द्वारीं । होय तो श्रीहरि प्रसन्न त्या

ubhen vrundavan jayachiye dvarin | hoy to shrihari prasanna tya

रचनाकार: संत नामदेव · अभंग
उभें वृंदावन जयाचिये द्वारीं । होय तो श्रीहरि प्रसन्न त्या ॥१॥ तुळसीचें रोप लावील जो आणोनि । तया चक्र-पाणी न विसंबे ॥२॥ तुळसीचें काष्ठ जपमाळ करी । तयासि श्रीहरि प्रसन्न तो ॥३॥ तुळसीची कीर्ति अगाध पैं आहे । पंध-रीसि पाहे ह्मणे नामा ॥४॥