भजनी मालिका
← भजनांकडे परत

उरा लावी उर आळंगितां कांता । संतासी भेटतां अंग चोरी

ura lavi ur alangitan kanta | santasi bhetatan ang chori

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
उरा लावी उर आळंगितां कांता । संतासी भेटतां अंग चोरी ॥१॥ अतीत देखोनि होय पाठीमोरा । व्याह्यासी सामोरा जाय वेगीं ॥ध्रु.॥ द्वीजा नमस्कारा मनीं भाव कैचा । तुर्कांचे दासीचा लेंक होय ॥२॥ तुका म्हणे तुम्ही क्रोधासी न यावें । स्वभावा करावें काय कोणीं ॥३॥