भजनी मालिका
← भजनांकडे परत

उघडली सतेज खाणी । लावण्याची बरवेपणीं

ughadali satej khani | lavanyachi baravepanin

रचनाकार: संत निळोबा · अभंग
उघडली सतेज खाणी । लावण्याची बरवेपणीं ॥१॥ विठो सुंदरा सुंदर । रुप नागर नागर ॥२॥ मुख अमृतकुपिका । पूर्णचंद्रउदयो लोका ॥३॥ निळा म्हणे कटीतटीं । मूर्ती साजिरी गोमटी ॥४॥