भजनी मालिका
संत नामदेव

संत नामदेव

विठ्ठलभक्त संत-कवी; कीर्तन परंपरेचे प्रवर्तक.

संत नामदेवांनी मराठी व हिंदीत अभंग रचले. त्यांनी भागवत धर्माचा प्रसार पंजाबपर्यंत केला; त्यांची काही पदे गुरु ग्रंथ साहिबमध्ये आहेत.

या संतांची भजने

पारधियासी तेव्हां दाटला गहींवर । लोटलें अपार प्रेम तेव्हां ॥१॥ जीवदान दिल्हें जावें तुम्हीं आता । न करावी चिंता कांहीं येथें ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

पारधी तो झड घालोनी पातला । घालावया घाला एकसरें ॥१॥ भयाभीत झालीं पांचही ते काळीं । वासना गुंतली एकमेकां ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

पाला खाऊनियां धाला बहिणी घरीं । भक्तिलागीं हरि वेडा झाला ॥१॥ सुदाम्याचे पोहे कोरडेचि खाय । मटमटां पाहे चहूंकडे ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

पाषाणाचा देव बोलेचि ना कधीं । हरि भवव्याधि केंवि घडे ॥१॥ दगडाची मूर्ति मानिला ईश्वर । परि तो साचार देव भिन्न ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

पाहतां तुझे चरण हरली भवव्यथा । पुढतीं एक चिंता वाटतसे ॥१॥ झणीं मुक्तिपद देसी पांडुरंगा । मग या संतसंगा कोठें पाहूं ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

पाहतील ग्रंथ सभाश्रेष्ठ महाजन । वैदिक शास्त्रज्ञ पुण्यश्लोक ॥१॥ देहान्त प्रायश्चित्त असे या बोलिलें । विचारुनि भलें हित करा ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

पाहातां देऊळाची पाठ । तीर्थें घडलीं तीनशें साठ ॥१॥ स्त्रान करितां पन्हाळें । उद्धरती सर्व कुळें ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

पाहिली गे माय पूर्वभूमि आपुली । बहुत सन्मानिली वैष्णवांनीं ॥१॥ चैत्रमास शिवरात्र उत्सव आगळा । जावें पां वेरुळा घृष्णेश्वरा ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

पाहिलें श्रीशैल्य निवृत्ती संगम । पापराशी भस्म देखतांचि ॥१॥ चालतां सुपंथीं ह्रदयीं विठठलमूर्ति । मुखीं नामकीर्ति गात चाले ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

पाहूं द्यारे मज विठोबाचें मुख । लागलीसे भूक डोळां माझ्या ॥१॥ कस्तुरी कुंकुम भरोनियां ताटीं । अंगीं बरवंट गोपाळाच्या ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

पाहे चहूंकडे धुंडोनि सुंदरी । देखे मुष्टी चारी तंदुळिका ॥१॥ तोचि शुद्धभाव उगवला पुढें । सर्वही तें कोडें देवालागीं ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

पिंगळा बोले महाद्वारीं । निशा सरली दिशा चारी । उठा उठा हो श्रीहरी । उदयो प्रकाशला दिनकरी ॥१॥ देवा शकून ऐकावा ॥ध्रु०॥

रचनाकार: संत नामदेव

पितयाची भक्ति पुंडलीकें केली । मात हे ऐकिली देव-रायें ॥१॥ नवलक्ष गोधनें पांचसें सवंगडे । रामकृष्ण पुढें चालताती ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

पिता शिकवी पुत्रासी । नको जाऊं बापा हरिकथेसि । तेथें पांचा तोंडांची विवशी । ते वैष्णवें आणिली आहे ॥१॥ तिचिया गळां रुंडमाळा । अंगीं स्मशानींचा उधळा । कंठीं सर्पाचें हळाहळ । गजचर्म पांघुरलें ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

पितृभजन जरी पुंडलिक न करिता । तरी कां हां झोंड येता पंढरीसी ॥१॥ वेव्हार करितां आम्हासी जिंकिलें । जन्ममरण केलें देशधडी ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

पुंडलिक वरद आनंदें अभेद । विठ्ठल विद्‌गद नाम तुझें ॥१॥ पाव गा वेगीं मजालागीं झडकारी । बुडतों भवसागरीं तारी मज ॥२॥

रचनाकार: संत नामदेव