भजनी मालिका
← भजनांकडे परत

पाहिली गे माय पूर्वभूमि आपुली । बहुत सन्मानिली वैष्णवांनीं

pahili ge may purvabhumi apuli | bahut sanmanili vaishnavannin

रचनाकार: संत नामदेव · अभंग
पाहिली गे माय पूर्वभूमि आपुली । बहुत सन्मानिली वैष्णवांनीं ॥१॥ चैत्रमास शिवरात्र उत्सव आगळा । जावें पां वेरुळा घृष्णेश्वरा ॥२॥ दशमीचे दिवशीं निघाले बाहेर । उठावले भार वैष्णवांचे ॥३॥ वेरूळ नगर असे पुरातन । विश्वकर्मा यानें कीर्ति केली ॥४॥ अगाध तें पुण्य बोलताती ऋषि । जावें वेरुळासी नामा म्हणे ॥५॥