भजनी मालिका
← भजनांकडे परत

पिंगळा बोले महाद्वारीं । निशा सरली दिशा चारी । उठा उठा हो श्रीहरी । उदयो प्रकाशला दिनकरी

pingala bole mahadvarin | nisha sarali disha chari | utha utha ho shrihari | udayo prakashala dinakari

रचनाकार: संत नामदेव · अभंग
पिंगळा बोले महाद्वारीं । निशा सरली दिशा चारी । उठा उठा हो श्रीहरी । उदयो प्रकाशला दिनकरी ॥१॥ देवा शकून ऐकावा ॥ध्रु०॥ संत साधु आपरमीत । अवघा करियेला थाट । टाळवीणे वाद्य वाजत । आवडी मंजुळ स्वरें गात ॥२॥ नादें अंबर दणाणलें । तेहतीस कोटी देव मिळाले । आवडी पहावया आले । स्वर्गसुखातें विसरले ॥३॥ आई रखुमाई माते । उठवा उठवा श्रीरंगातें । नारद तुंबर गायनातें । कर जोडूनि हनुमंत ॥४॥ उठिला सांव्ळा वनमाळी । आनंदली भक्तमंडळी । जयजयकारें पिटिली टाळी । विठ्ठल नामें दिधली आरोळीं ॥५॥ पिंगळा आनंदला मनीं । तेज न माये गगनीं । हर्षें घातली लोळणी । शिंपी नामा तुझे चरणीं ॥६॥