भजनी मालिका
← भजनांकडे परत

पिता शिकवी पुत्रासी । नको जाऊं बापा हरिकथेसि । तेथें पांचा तोंडांची विवशी । ते वैष्णवें आणिली आहे

pita shikavi putrasi | nako jaun bapa harikathesi | tethen pancha tondanchi vivashi | te vaishnaven anili ahe

रचनाकार: संत नामदेव · अभंग
पिता शिकवी पुत्रासी । नको जाऊं बापा हरिकथेसि । तेथें पांचा तोंडांची विवशी । ते वैष्णवें आणिली आहे ॥१॥ तिचिया गळां रुंडमाळा । अंगीं स्मशानींचा उधळा । कंठीं सर्पाचें हळाहळ । गजचर्म पांघुरलें ॥२॥ नको जाऊं बापा तेथें । मागुता न येशीं रे येथें । जे जे पाहूं गेले तियेतें । ते आले नाहीं मागुते ॥३॥ चंद्र पाहों गेला तियेसी । ओढूनि बांधिला भाळेसी । तैसा पडसी अभरंवशीं । मग मुकशी संसारासी बापा ॥४॥ वारितां वारितां ध्रुव गेला । तो नेऊनि अढळपदीं घातला । बळीस देश-वटा दिधला । तो घातला पाताळीं ॥५॥ नारदा दिधली कांसवटी । हनुमान केला हिंपुटी । रुक्मांगदाची वैकुंठी । नगरी नेऊनि घातली ॥६॥ तिचें वैष्णव लहाणें । कळों नेदिती आपुलीं विंदानें । हरि-कथांरंगीं नाचणें । नामकल्लोळीं ॥७॥ तीस दहा हात अकरा डोळे । ती किती काळाची न कळे । भयानक श्रीमुख कमळें । हातीं घे-ऊनि हिंडतसे ॥८॥ भस्म डौर त्रिशूल हातीं । ते न वर्णवे वेदश्रुतीं । तीसी नाहीं कुळ याती । आपपर ते कैचें ॥९॥ ते वेदशास्त्रां अगो-चर । ती सवें असे एक ढोर । कोठें न मिळेचि बिढार । ह्मणोनि स्मशांनीं वसतसे ॥१०॥ ऐसी ती थोर लांव । तिसी गांव ना शीव । कोठेंचि न मिळे ठाव । म्हणोनि समुद्रीं ॥११॥ तेथें सर्पाचें अंथरूण करी । निद्रा उदका भीतरीं । तया वैष्णवा माझारीं । निरंतरी वर्ततसे ॥१२॥ सांगेन ते परियेसीं । आहे ती संत मह-तापाशीं । आणि हरिकथेसी । बैसली असे ॥१३॥ ह्मणवोनी विश्वासें तूं जासी । मुकसी आपल्या संसारासी । नामा विनवी श्रोतयांसी । हें बोलणें वेदांचें ॥१४॥