आणिक साधन नाहीं नाहीं जगीं । नामपाठ वेगीं गाय जना
anik sadhan nahin nahin jagin | namapath vegin gay jana
आणिक साधन नाहीं नाहीं जगीं । नामपाठ वेगीं गाय जना ॥१॥ तुटली बंधनें खुंटलें पतन । नामपाठ खुण वैकुंठाची ॥२॥
सोळाव्या शतकातील पैठणचे संत; एकनाथी भागवत व भारुडांचे कर्ते.
anik sadhan nahin nahin jagin | namapath vegin gay jana
आणिक साधन नाहीं नाहीं जगीं । नामपाठ वेगीं गाय जना ॥१॥ तुटली बंधनें खुंटलें पतन । नामपाठ खुण वैकुंठाची ॥२॥
anik sadhanin nako guntun mana | dhari ya charanin | vithobachya
आणिक साधनीं नको गुंतुं मना । धरी या चरणीं । विठोबाच्या ॥१॥ वाउगा बोभाट कासया खटपट । पंढरीची वाट सोपी बहु ॥२॥
anikanchi as nako karun mana | chinti tun charana vithobachya
आणिकांची आस नको करूं मना । चिंती तूं चरणा विठोबाच्या ॥१॥ वाचे नाम गाये वाचे नाम गाये । वाचे नाम गाये विठोबाचे ॥२॥
anikanche dharitan as | hoto nash jivitva
आणिकांचे धरितां आस । होतो नाश जीवित्वा ॥१॥ म्हणोनि निर्धारिलें मन । धरिलें ठाणें रामकृष्ण ॥२॥
anikanchen mat naka padun teth | bhaja pandharinath ekabhaven
आणिकांचें मत नका पडुं तेथ । भजा पंढरीनाथ एकभावें ॥१॥ काय होणार तें होईल देहांचें । नाशिवंत साचें काय हातीं ॥२॥
anikachen maten sayas na karanen | amhansi pahune pandharirav
आणिकाचें मतें सायास न करणें । आम्हांसी पाहुणे पंढरीराव ॥१॥ डोळां भरुनिया पाहिलें देवासी । तेणें चौर्यायंशी चुकली सत्य ॥२॥
anikache manin anik sankalpa | na dhara vikalpa vasanecha
आणिकाचे मनीं आणीक संकल्प । न धरा विकल्प वासनेचा ॥१॥ नका यातायाती वाउगी फजिती । उगवा गोवांगुंती आपुलाली ॥२॥
anikasin jata sharan | hen ton tumhan univapan
आणिकासीं जाता शरण । हें तों तुम्हां उणीवपण ॥१॥ दास विठोबाचें व्हावें । तिहीं सर्व सुख भोगावें ॥२॥
anikachen namen kon ho tarala | aisen sanga mala nivodoni
आणीकाचें नामें कोण हो तरला । ऐसें सांगा मला निवोडोनी ॥१॥ या रामनामें पातकी पतीत । जीव असंख्यात उद्धरीले ॥२॥
anuni dhondoba kondiyela gharin | mat sange harijavali nama
आणुनी धोंडोबा कोंडियेला घरीं । मात सांगे हरिजवळी नामा ॥१॥ दामशेटी गेला आपुले कारणा । मागें आणिलें जाणा धोंडोबासी ॥२॥
anuniyan sinhasanin baisavila | puja upachar kela shodashopachar
आणूनियां सिंहासनीं बैसविला । पूजा उपचार केला षोडशोपचार ॥१॥ वस्त्र अलंकार देउनी गौरविला । मग पुसता जाहला क्षेम सर्व ॥२॥
atan amhin sahajachi thor | brahma vishnu maheshvar | parabrahma svayen omkar | paratpar jagadatma
आतां आम्हीं सहजचि थोर । ब्रह्मा विष्णु महेश्वर । परब्रह्मा स्वयें ॐकार । परात्पर जगदात्मा ॥१॥ आम्हीं सहजचि स्वतः सिद्ध । जागृति सुषुप्ति साध्य । तूर्या त्रिसाक्षीणी बोध । अति अगाध उन्मनी ॥२॥
atan uralen ten mat | tethen vastu sadodit | tyasi nahin ant | kavane kalin
आतां उरलें तें मत । तेथें वस्तु सदोदित । त्यासी नाहीं अंत । कवणे काळीं ॥१॥ महाकारण शरीर । ज्याचा अभिमानी ईश्वर । मुर्ध्नीं तें घर । ब्रह्माडीचें ॥२॥
atan kay pujun deva | majhi maj ghade seva
आतां काय पुजुं देवा । माझी मज घडे सेवा ॥१॥ तोडुं गेलों तुळशीपान । तेथें पाहतां मधुसूदन ॥२॥
atan karan jen adnyan | tenhin gelen vosaron | bodhachen asan | baisalen tethen
आतां कारण जें अज्ञान । तेंहीं गेलें वोसरोन । बोधाचें आसन । बैसलें तेथें ॥१॥ कारण रुप सुषुप्ति । आनंद भासत हृदयीं प्राप्ती । या समस्ताची वस्ती । वस्तु झाली ॥२॥
atan dharmadharma vichar | to aika savistar
आतां धर्माधर्म विचार । तो ऐका सविस्तर ॥१॥ शुद्र पतीत गृहींचें अन्न । एक रात्र पावन जाण ॥२॥
atan yajan kaishapari | sansara nohe uri
आतां यजन कैशापरी । संसारा नोहे उरी ॥१॥ सदगुरुवचन मंत्र अरणी । तेथोनि प्रगटला निर्धुम अग्नी ॥२॥
atmadnyan vaishvanarin | dhup jalila sarobhari
आत्मज्ञान वैश्वानरीं । धूप जाळिला सरोभरी ॥१॥ तेणें मातला परिमळ । पिंडब्रह्मांडीं सकळ ॥२॥
atmadnyanen bimbalen hrudayin | datta volakhila thayin
आत्मज्ञानें बिंबलें हृदयीं । दत्त वोळखिला ठायीं ॥१॥ पारिखेपणा दुर केला । अवघा दत्तचि गमला ॥२॥
atmatvachen thayin sarva ekakar | nahin narinar bhed bhinna
आत्मत्वाचें ठायीं सर्व एकाकार । नाहीं नारीनर भेद भिन्न ॥१॥ वर्णाश्रम धर्म ज्ञाति कुलगोत । एकाकारी होत आत्मतत्त्वीं ॥२॥