भजनी मालिका
← भजनांकडे परत

आणिकांची आस नको करूं मना । चिंती तूं चरणा विठोबाच्या

anikanchi as nako karun mana | chinti tun charana vithobachya

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
आणिकांची आस नको करूं मना । चिंती तूं चरणा विठोबाच्या ॥१॥ वाचे नाम गाये वाचे नाम गाये । वाचे नाम गाये विठोबाचे ॥२॥ करकटीं उभा चंद्रभागें तटीं । पुंडलिकापाठीं धरूनी ध्यान ॥३॥ ठेविले चरण दोन्हीं विटेवरी । वाट पाहे हरी भाविकाची ॥४॥ एका जनार्दनीं उभारुनी बाह्मा । आलंगीत आहे भोळे भोळे ॥५॥