भलते भावें शरण येतां । निवारी जन्ममरण चिंता
bhalate bhaven sharan yetan | nivari janmamaran chinta
भलते भावें शरण येतां । निवारी जन्ममरण चिंता । उदार लक्ष्मीचा दाता । साक्ष पुंडलीक करुनी सांगे ॥१॥
सोळाव्या शतकातील पैठणचे संत; एकनाथी भागवत व भारुडांचे कर्ते.
bhalate bhaven sharan yetan | nivari janmamaran chinta
भलते भावें शरण येतां । निवारी जन्ममरण चिंता । उदार लक्ष्मीचा दाता । साक्ष पुंडलीक करुनी सांगे ॥१॥
bhavabhayanashak ramanam tarak | shankar raja sukh janatase
भवभयनाशक रामनाम तारक । शंकर राजा सुख जाणतसे ॥१॥ योगयाग नको आणिक साधनें । नामपरतें पेणें आणिक नाहीं ॥२॥
bhavaroga aushadh jan | namamatra narayan
भवरोगा औषध जाण । नाममात्रा नारायण ॥१॥ तेणें निरसे भवरोग । न लगे साधन अष्टांग ॥२॥
bhavarogasi vokhad | ramanam henchi shuddha
भवरोगासी वोखद । रामनाम हेंचि शुद्ध ॥१॥ येणे तुटे रोग व्यथा । भुक्ति मुक्ति वंदिती माथा ॥२॥
bhavarogiyasi upay | dharaven ten santapay
भवरोगियासी उपाय । धरावें तें संतपाय ॥१॥ तेणें तुटे जन्मजराकंद । वायां छंद मना नये ॥२॥
bhavarogiyansi aushadh hen nam | sevave param avadinen
भवरोगियांसी औषध हें नाम । सेवावे परम आवडीनें ॥१॥ सर्वकाळ करा नामाचें चिंतन । सदा समाधान होय तेणें ॥२॥
bhavasindhu taraya nam hen nauka | utar ten loka sopa keli
भवसिंधु तराया नाम हें नौका । उतार तें लोका सोपा केली ॥१॥ न घडे न घडे आणिक साधन । नाम पंचानन नाम पुरे ॥२॥
bhavasindhusi utar | harihar mhanatan nirdhar
भवसिंधुसी उतार । हरिहर म्हणतां निर्धार ॥१॥ हीच घ्या रे प्रचीत । सर्व पुरती मनोरथ ॥२॥
bhagirathi ani bhimarathi vadatan | saman tatvatan kalimajin
भागीरथी आणि भीमरथी वदतां । समान तत्वतां कलीमाजीं ॥१॥ प्रातःकाळीं नमस्मरण जो गाय । तीर्थीं सदा न्हाये पुण्य जोडे ॥२॥
bhagya ujalalen atan | sant sabhagyata bhetale
भाग्य उजळलें आतां । संत सभाग्यता भेटले ॥१॥ पाप ताप दैन्य गेलें । संत पाउलें देखतां ॥२॥
bhagyavant shrihariche das | dharitan kas tariti
भाग्यवंत श्रीहरीचे दास । धरितां कास तारिती ॥१॥ धन्य त्यांचा उपकार । पावविले पार बहुत ॥२॥
bhagyavant sant hoti | din patit tariti
भाग्यवंत संत होती । दीन पतीत तारिती ॥१॥ नाहीं तया भाग्या पार । काय पामर मी बहूं ॥२॥
bhagyavant hoti sant | din patit tariti
भाग्यवंत होती संत । दीन पतीत तारिती ॥१॥ उपदेश विठ्ठल मंत्र । देती सर्वत्र सारिखा ॥२॥
bhagyahin bahu asati | kamalapati sambhalanen
भाग्यहीन बहु असती । कमळापती सांभाळणें ॥१॥ गर्जें ब्रीदाची तोडर । चराचर त्रिभुवनीं ॥२॥
bhagyacha uday jhala | santasang maj ghadala
भाग्याचा उदय झाला । संतसंग मज घडला ॥१॥ तेंणें आनंदाचे पुर । लोटताती निरंतर ॥२॥
bhagyachen te narinar | gati nirantar mukhi nam
भाग्याचें ते नारीनार । गाती निरंतर मुखी नाम ॥१॥ धन्य धन्य त्याचा जन्म । सुफळ सर्व कर्म धर्म ॥२॥
bhagyanchen bhagya dhanya ten sansarin | santhaviti hari hrudayamajin
भाग्यांचें भाग्य धन्य तें संसारीं । सांठविती हरि हृदयामाजीं ॥१॥ धन्य त्यांचें कुळ धन्य त्याचें कर्म । धन्य त्याचा स्वधर्म नाम मुखा ॥२॥
bhandachen tond bhand puran | vari shimagyacha san
भांडाचें तोंड भांड पुराण । वरी शिमग्याचा सण ॥१॥ काय उणें मग भांडा । बोलती वाउगें तें तोंडा ॥२॥
bhambavala dev santamagen dhaven | ughadachi prabhave pandhariye
भांबावला देव संतामागें धावें । उघडाचि प्रभवे पंढरीये ॥१॥ युगें अठ्ठावीस पुंडलिकासाठीं । उभा जगजेठी विटेवर ॥२॥
bhambavale jan mhanati majhen majhen | vaugenchi vojhen vahatati
भांबावले जन म्हणती माझें माझें । वाउगेंचि वोझें वाहताती ॥१॥ खराचिये परी उकरडा सेविती । नोहे तयां गती अधम जाणा ॥२॥