भजनी मालिका
← भजनांकडे परत

भागीरथी आणि भीमरथी वदतां । समान तत्वतां कलीमाजीं

bhagirathi ani bhimarathi vadatan | saman tatvatan kalimajin

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
भागीरथी आणि भीमरथी वदतां । समान तत्वतां कलीमाजीं ॥१॥ प्रातःकाळीं नमस्मरण जो गाय । तीर्थीं सदा न्हाये पुण्य जोडे ॥२॥ वदतां वाचें नाम घडतां एक स्नान । पुनरपि न आगमन मृत्यूलोकमें ॥३॥ एक जनार्दनीं भीमरथीं वदतां । प्रयागीं समता सरी न पवे ॥४॥