भजनी मालिका
← भजनांकडे परत

भाग्य उजळलें आतां । संत सभाग्यता भेटले

bhagya ujalalen atan | sant sabhagyata bhetale

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
भाग्य उजळलें आतां । संत सभाग्यता भेटले ॥१॥ पाप ताप दैन्य गेलें । संत पाउलें देखतां ॥२॥ तुटली बंधनाची गांठी । पाय पोटीं आठवितां ॥३॥ एका जनार्दनीं शरण । संतचरण दुर्लभ ॥४॥